खोपोली ( कु. अदिती पवार) : वरची खोपोली वार्ड नं. 4 येथील शिगवण यांच्या घरासमोरील नाला (गटार) 10 ते 12 वर्षांपासून तुटले असुन तेथे राहणारे नागरिक त्या नाल्यावरुन जीव मुठीत घेऊन ये – जा करत आहेत. वारंवार तक्रार देउन सुध्दा लोकप्रतिनिधी व नगरपालिका ह्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. त्या नाल्यात नागरिक, वृध्द , लहान मुल पडुन दुखाःपत होण्याची शक्यता आहे. व त्या परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाने त्वरीत दुरुस्त करावे असे निवेदन मुख्याधिकारी यांना वरची खोपोलीतील नागरिकांनी निवेदन दिले. यावेळी कु. अदिती पवार, सौ. किशोरी शिगवण, संगीता गुरव , सुलक्षणा दाभाडे, रेश्मा ढुमणे, माया शिंदे, मंगल ढुमणे, सागर मोरे, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.