मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जालना येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून आर आर खडके, मांगीराम चोपडे, निर्मला पाटील हे होते. बैठकीत मध्यप्रदेश राज्यप्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मीकांत कोलते यांची सर्वानुमते मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांचे कार्यक्षेत्र मध्य भारत राहील.मध्य भारतातील महाराष्ट्र,मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांचा कारभार लक्ष्मीकांत कोलते यांच्याकडे राहील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपानराव क्षीरसागर यांनी तर आभारप्रदर्शन शिवाजीराजे पाटील यांनी केले. कोलते हे मेहनत,चिकाटी व सातत्य या जोरावर राष्ट्रीय उपाध्यक्ष या पदापर्यंत पोहचले आहे. त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महामानवांच्या विचार प्रचारासाठी त्यांनी शेकडो व्याख्यान केली आहे. त्यांचे धनंजय पाटील, योगेश खरात, गजानन सोनवणे, सुर्यकांत खरात, यशवंत जगताप उत्कर्षा देशमुख, योगिता पवार, अर्चना नेरपगारे,अनिता काळे यांनी अभिनंदन केले आहे.