कै .कविवर्य सुरेश विठ्ठल पाठक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज सुलाखे हायस्कूल बार्शी येथील जुलै 2022 मध्ये झालेल्या इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . महेंद्र कोळेकर पशुधन विकास अधिकारी वर्ग -1 पशुसंवर्धन विभाग ,बार्शी व सौ सायली नितीन देशपांडे -पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला . प्रारंभी इयत्ता 5 वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील मधील 9 विद्यार्थी, इ. 8वी चे 7 असे एकूण 16 विद्यार्थ्याना ट्रॉफी व गुलाबपुष्प देवुन मान्यवराच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक गणेश वाघमारे व सूर्यकांत चोरमले यांचेही बुके देवुन सत्कार करण्यात आला .याप्रसंगी पालक वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
डॉ. महेंद्र कोळेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हा .जरी डिजिटल जमाना असला तरी मोबाईल पासून दूर राहा .शालेय शिस्त पाळा .सौ सायली नितीन देशपांडे पाठक म्हणाल्या की, माझ्या बाबांच्या स्मृती प्रित्यर्थ आज स्कॉलरशिप मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा माझ्या शाळेमध्ये होतंय याचा मला मनस्वी आनंद होत आहे . तसेच समोर आलेल्या परिस्थितीला तोंड द्या . खचून जाऊ नका व पुढे वाटचाल करा असा मोलाचा सल्ला दिला .रामचंद्र इकारे म्हणाले की, सु.वि. पाठक हे एक साहित्य क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व होत . ते माझे साहित्यिक गुरु होते .अनेक नवोदित साहित्यिकांना मार्गदर्शन करण्याचे काम सरांनी केले .या गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर होते .ते अध्यक्षीय मनोगतात म्हणाले , एक मुलगी आपल्या बाबांच्या स्मृती प्रित्यर्थ असा हा गुण गौरव सोहळा पार पाडतेय याचा मला सार्थ अभिमान वाटतो . प्रशालेचे उप प्राचार्य रामकृष्ण इंगळे , कै . सु वि .पाठक यांचे जावई नितीन देशपांडे व महारुद्र जाधव व्यासपिठावर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशालेतील गणित शिक्षक सूर्यकांत चोरमले यांनी केले .