सौ. अनिता काळे
अहमदनगर जिल्ह्यात धक्कादाय घटना घडलीय. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव येथील गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शनिवार दि. 25 फ्रेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळ च्या वेळी डिस्टिलरी विभागात ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी 70 ते 80 कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पैठण शेवगांव रोडवरील गंगामाई साखर कारखाण्यात डीसलरी विभागात स्फोट…पैठण एमआयडीसी अग्निशमन दल बचाव कार्यासाठी रवाना pic.twitter.com/2twXxYu7is
— Hirkani News (@hirkaninews) February 25, 2023
आगीची घटना घडताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पैठण एमआयडीसी अग्निशमन दल बचाव कार्यासाठी रवाना झाले आहे.