सोलापूर (निर्मला जावळे) सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी गावात जागतीक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील सर्व महिला व विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक श्री. ढवणे सर व महिला बचत गटाचे श्री. गायकवाड सर, गावचे सरपंच व उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणप्पा बाराचरे, युवा नेते धीरज छपेकर, आप्पू आण्णा थोंटे, रामचंद्र होनराव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सवार्ंनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच बचत गटाच्या ऑफिस बद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी सोलापूर च्या उद्योजीका चंद्रिका चव्हाण यांनी त्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती दिली. पापड उद्योग, कडक भाकरी, गृहउद्योग आदी विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी बचत गटामध्ये कार्यरत असणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला.