जालना : नांदेड ते मनमाड धावणार्या मराठवाडा एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करणार्या एका गरोदर मातेची रेल्वेतच प्रसुती झाली. ही घटना आज दि. 19 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जालना ते करमाड दरम्यान करमाड रेल्वे स्थानकाजवळ घडली.
अधिक ताज्या बातम्या वाचन्यासाठी आणि विडीओ पाहण्यासाठी याच जाहिरातीवर क्लिक करुन हिरकणी अॅप डाऊनलोड करा… सोबतच हिरकणी न्यूज चॅनलला सब्सक्राईल नक्की करा…
गरोदर महिला ही महिला नांदेड ते छत्रपती संभाजीनगर डी-4 मधुन प्रवास करीत होती. तीचे रिझर्वेशन होते. रेल्वेने जालना स्थानक सोडल्यानंतर तीला अचानक प्रसुतिच्या वेदना सुरु झाल्या. रेल्व बदनापुर जवळ येत असतांना तीच्या वेदना अधिक तिव्र झाल्या, त्यामुळे गाडीतच असलेल्या महिला प्रवाशांनी तीला सुरक्षा देत प्रसुतिसाठी मदत केली. त्यावेळी टी.सी. राकेश कुमार मीना व टी.सी. अभिषेक कुमार, पत्रकार सुवेश कुलकर्णी यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धावाधाव सुरु केली. गाडीत कुणी डॉक्टर आहे का याची माहिती घेत फिरले. त्यावेळी त्याच गाडीत सी-1 एसी मध्ये असलेल्या डॉ. अश्विनी इंगळे या नांदेड वरुन छत्रपती संभाजीनगर साठी प्रवास करीत होत्या. त्यांना या महिलेची माहिती दिली असता त्या तात्काळ गरोदर महिलेची प्रसुती करण्यासाठी धावल्या. त्यांनी मोजक्याच उपकरणाच्या आधारे सदरील महिलेची प्रसुति गाडीतच सुखरुप केली असून महिलेस मुकंदवाडी स्टेशन येथून रुग्णवाहीकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या रुग्णवाहीकेची व्यवस्था टी.सी. राकेश कुमार मीना व टी.सी. अभिषेक कुमार यांनी करुन दिली.