मुरूड जंजिरा(प्रतिनीधी,सौ नैनिता कर्णिक) – कोकण मराठी साहित्य परिषद मुरूड जंजिरा.रायगड तर्फे मुरूड दत्तटेकडीवर शिदोरी फ्रुड या ठिकाणी “साहित्य संवाद” कार्यक्रम आयोजित करण्यात आला.प्रथम को.म.सा.प.शाखा मुरूड अध्यक्ष संजयजी गुंजाळ, उपाध्यक्षा उषा खोत, कार्याध्यक्ष अरूणजी बागडे,सचिव नैनिता कर्णिक, नगरपरिषद प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर प्रमुख अतिथी देवदत्त साने, डाॅ रविंद्र नामजोशी व अन्य मान्यवरांकडून दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.सर्वांचे सुवर्ण चंपक देऊन स्वागत करण्यात आले.
तद्नंतर साहित्यिक खेळ घेण्यात आले. यात सर्व सदस्यांनी आपल्या आलेल्या विषयावर सुंदर कविता, सुविचार, उखाणे, लेख इत्यादी सादरीकरण केले. यात वेगवेगळया विषयांची माहिती मिळाली. साहित्य संवाद मैफलीत गझलकार सिद्धेश लखमदे, लेखक कवी देवदत्त साने,माजी अध्यक्षा प्रतिभा जोशी ,दिपाली दिवेकर,माजी नगरसेवक पांडुरंग आरेकर सर,सीमा साने, वासंती उमरोटकर , उषा खोत, उर्मिला नामजोशी शशीकांत भगत, ओम् जोशी , प्राची केने, गार्गी खोत ,सदानंद जाधव ,उर्मिला जाधव,उमा बागडे,आशिष पाटील,आशुतोष कर्णिक, गीतगायनामध्ये डाॅ.नामजोशी यांच्या गीताला अरूणजी बागडे , देवदत्त साने यांनी तबला व पेटीची साथ दिली. कार्यक्रमाचे औचित्य साधून रांगोळीकार महेंद्र पाटील यां नी स्वत: तयार केलेली निसर्गचित्र फ्रेम शिदोरी फ्रुडच्या मालक प्राची रोहित केने यांना मान्यवरांकडून प्रदान करण्यात आली.
सूत्रसंचालन सायली गुंजाळ यांनी उत्तमरीत्या केले. सचिव नैनिता कर्णिक यांनी सर्व उपस्थित मान्यवर,सदस्यांचे आभार मानून अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.