रायगड (संगिता ढेरे) – जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कोप्रोली गावामधील एका सामान्य कुटुंबातील जीचे वडील एक ऑटो रिक्षा चालक आहेत आणि आई छोटे मोठे काम करून घर सांभाळत आहे त्यांची मुलगी दिशा संतोष कोळी आज गुरवार दिनांक २१/०९/२०२३ रोजी प्रसारित होणाऱ्या शाळे बाहेरची शाळा या आकाशवाणी केंद्रावर झळकली.
समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि प्रथम एजुकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निपुण महाराष्ट्र हे अभियान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत भाषिक आणि गणितीय कौशल्य प्राप्त करण्यासाठी मातापालक गटाच्या सहभागाने राज्यभर राबविले जात आहे. यासोबतच अंगणवाडी ते प्राथमिक इयत्तासाठी “शाळेबाहेरची शाळा” कार्यक्रम देखील प्रत्येक आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार रोजी प्रसारण केले जात आहे.
गुरुवारी सकाळी रेडिओ आकाशवाणी केंद्रावरील मुलाखतीत बोलताना तिच्या आईला माधवी कोळी हिला प्रश्न केला की मुलीकडून काय अपेक्षा आहेत तर त्या म्हणाल्या तिला जे हवे ते तिने करावे कारण आपण त्यांच्यावर आपल्या अपेक्षा लादण्या पेक्षा त्यांना जे हवे ते करावे आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे असे त्या म्हणत होत्या.
दिशा कोळी हिला तिच्या पुढील वाटचाली साठी तिच्या कोप्रोली गावातील तसेच
कोळीवाड्यातील सुर्यानी कोळी पोलिसपाटील यांनी देखील शुभेच्छा दिल्या .तसेच कोळी बांधवांनी पण खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आणि तिचे सर्वत्र कौतुक होत आहे . यात तिला प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या शिक्षकांचे तसेच , उरण मधील प्रथम प्रतिनिधिंचे ही तिच्या परिवाराकडून आभार वेक्त केले जाते आहे .