सातारा – दुधाच्या टॅंकरमधून दारु विक्री होत असल्याचा अजब आणि धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यामधून समोर आला आहे. साताऱ्यात उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून २० लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, साताऱ्यात उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमध्ये दुधाच्या टॅंकरमधून चक्क दारु विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला.
चिपळूण कराड रस्त्यावर गोशाटवाडी येथे दुध टॅंकरची चौकशी केली असता समोरचे चित्र पाहून पोलीसही हादरुन गेले.
साताऱ्यातील चिपळूण कराड मार्गावर मौजे गोशाटवाडी गावच्या हद्दीत कराडच्या दिशेने निघालेल्या सकस दुधाच्या सहा चाकी वाहनाला संशय आल्याने अडवण्यात आले.
या कारवाईत गोवा बनावट दारूचे एकूण 25 बॉक्स असलेला 19 लाख 75 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने पकडला. याप्रकरणी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.