नाशिक: मनमाड-येवला राज्य महामार्गावर स्विफ्ट कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून कारमधील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अंकाईजवळील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात घडला घडला. अपघातातील सर्व प्रवासी हे नाशिकमधील गंगापूर या ठिकाणचे आहेत.
रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नाव असून पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी आहेत. मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उरकून येवला मार्गे नाशिककडे परतत असताना हा भीषण अपघात झाला. अपघातात कार अक्षरशः चक्काचूर झाली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या अपघाताच्या वेळी अवकाळी पाऊस आणि रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्य राबवण्यास अडथळा येत होता. त्यामुळे वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती.