जालना – जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने थैमान घातलंय. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेतात जावून शेतकर्यांच्या नुकसानीची पाहणी केलीय. खरपुडी, धारकल्याण, पिरकल्याण अदी मतदार संघात ठिक-ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे आगामी अधिवेशनात शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आवाज उठविणार असल्याचं आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय.
मागील काळातील शेतकर्यांना मिळणारी नुकसान भरपाई अजुनही मिळाली नाही असेही गोरंट्याल यांनी म्हटलंय. त्यांनी केलेल्या पाहणी दरम्यान मोसंबी, द्राक्ष, सिताफळ, ज्वारी, हरभरा आदी पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं पहायला मिळालंय. त्यामुळे शेतकर्यांना लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय.