पिंपरी : चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी आगीमध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने पोहोचली असून जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी आग लागली तिथे केकवरील फायर कँडलचा कारखाना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास तळवडे या ठिकाणी भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अद्याप मृतांची ओळख पटली नाही. घटनास्थळी चिखली आणि देहूरोड पोलीस त्याचबरोबर अग्निशमन दलाचे वाहने पोहोचली आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून फायर कँडल कंपनी जळून खाक झाली आहे. यात काही जण अडकले असून बचावकार्य सुरू आहे. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.