जालना – संजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलला अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी नॅशनल अॅक्रेडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर आधीस्वीकृती मिळाली आहे. हॉस्पिटलच्या विश्वासनिय सेवेला मिळालेली ही पोच पावती असून भविष्यात अधिक चांगली सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही संजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे वैद्यकीय संचालक डॉ. बळीराम बागल यांनी दिली. रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देऊन अचूक निदान व योग्य उपचार कीफायतशीर दरात मिळावेत यासाठी रुग्णालय नेहमीच तत्पर असल्याचंही डॉ. बागल यांनी म्हटलंय.
संजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यास एनएबीएच मानांकनाच्या आधीस्विकृतीमुळे हॉस्पिटलची विश्वासाहर्ता अधिक वाढली. त्यामुळे त्याचा फायदा रुग्णांनाच होईल असही त्यांनी म्हटलंय. सर्व डॉक्टर व कर्मचार्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाचे हे यश असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. एनएबीएच मान्यतेमुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिकच वाढली असून सांघिक प्रयत्न करून ती निश्चित पूर्ण करू असा विश्वास डॉ. बागल यांनी व्यक्त केला.
या अवलोकणात रुग्णालयाची इमारत, परिसर, रुग्णालायची कार्यपद्ध, मिळणार्या सुख सुविधा, रुग्णाचे आरोग्य व काळजी, रुग्णाची वेगवेगळ्या संमती, रुग्णावरती होणार्या उपचारचा विहित दर्जा, जिवानुजन्य टाकाऊ वस्तु चे वर्गीकरण व विल्हेवाट, कर्मचार्यांचे लसीकरण, औषदलयातील औषदांचा साठा व व्यवस्थापन रिींहेश्रेसू विभागात येण्यार्या रक्तांच्या नमून्यांचे संकलन, तपासणी, रिपोर्टस निर्मिती, कालमर्यादा व तपासानी, क्ष-किरण संरक्षण पद्धती, दर्जेदार कार्यपद्धती, अश्या प्रकारच्या एकूण 834 मूल्यांद्वारे तपासणी करण्यात येते. आणि या सर्व प्रक्रीयेचा टप्पा संजिवनी हॉस्पीटलने पार केलाय. यावेळी वैद्यकीय संचालक डॉ. बळीराम बागल, डॉक्टर शिवदास मिरकड, डॉक्टर राजेंद्र राख, डॉक्टर कैलास राजगुरू, डॉ. मिलींद काटोळे, डॉ. बद्रीप्रसाद घुगे, डॉ. तुषार अग्रवाल, डॉ. निशांत गोयल यांची यावेळी उपस्थिती होती. या यशस्वी कामगीरीत सर्व डॉक्टर, कर्मचारी यांचे मोठे योगदान असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मान्यताचे रुग्णांसाठी फायदे
सर्व भागधारकांमध्ये रुग्ण हे सर्वात मोठे लाभार्थी आहेत.
मान्यताप्राप्तीमुळे उच्च दर्जाची काळजी आणि रुग्णाची सुरक्षा मिळते.
रुग्णांची सेवा ओळखपत्र असलेल्या वैद्यकीय कर्मचारयांद्वारे केली जाते.
रुग्णांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण केले जाते. रुग्णाच्या समाधानाचे नियमितपणे मूल्यांकन केले जाते.
संस्थेसाठी फायदे
आरोग्य सेवा संस्थेला मान्यता दिल्याने सतत सुधारणा होण्यास चालना मिळते. हे संस्थेला दर्जेदार काळजी आणि रुग्णाच्या सुरक्षेसाठीवचनबद्धताप्रदर्शित करण्यास सक्षम करते ज्यामुळे सर्वोत्तम क्लिनिकल परिणामांची खात्री होते. हे अॅक्रेडेन्शिअल वैद्यकीय कर्मचारयांनी प्रदान केलेल्या सेवा म्हणून आरोग्य सेवा संस्थेद्वारे प्रदान केलेल्या सेवांवर समुदायाचा विश्वास वाढवते. हे हेल्थकेअरयुनिटला सर्वोत्कृष्ट बेंचमार्क करण्याची संधी देखील प्रदान करते. मान्यताप्राप्त स्थिती स्पर्धात्मक आरोग्य सेवेमध्ये विपणन फायदा देखील प्रदान करते. शेवटी, मान्यता ही विमा आणि इतर तृतीय पक्षांद्वारेनियुक्तीची वस्तुनिष्ठ प्रणाली प्रदान करते.
कर्मचार्यांसाठी फायदे
मान्यताप्राप्तहॉस्पिटलमधील कर्मचारी खुप समाधानी आहेत कारण ते सतत शिकणे, चांगले कार्य वातावरण आणि नेतृत्व प्रदान करते. मान्यता प्राप्त इस्पितळात कर्मचार्यांची कार्यक्षमता आणि क्षमता देखील सुधारली जाते. हे वैद्यकीय आणि पॅरा मेडिकल कर्मचारयांसह सर्व कर्मचारयांच्यापरिभाषित मालकी आणि उत्तरदायित्वासह पद्धतशीर पद्धतीने संपूर्ण व्यावसायिक विकास, ज्ञान आणि क्षमता सुधारते. पैसे देणार्या आणि नियामक संस्थांना लाभ शेवटी, मान्यता ही विमा आणि इतर तृतीय पक्षांद्वारेपॅनेलमेंटची वस्तुनिष्ठ प्रणाली प्रदान करते. मान्यता सुविधा, पायाभूत सुविधा आणि काळजीच्या पातळीवर विश्वासार्ह आणि प्रमाणित माहिती मिळवते