जालना – तालुक्यातील चापडगाव आणि राठी अंतरवाली येथील गावकऱ्यांनी केलेल्या मगणीनुसार समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांनी दोन्ही गावात सभामंडप उभारण्यासाठी निधी मंजुर करुन आणला. बुधवारी या सभामंडपाच्या कामाचे सतीश घाटगे यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
कोणतेही संविधानिक पद नसताना समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी शासनाकडे पाठपुरावा घनसावंगी तालुक्यातील गावागावात विकासकामे सुरु केली आहे. प्रामाणिक करदात्यांच्या पैशातून व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यातून ही कामे सतीश घाटगे यांच्या माध्यमातून होत आहे. चापडगाव, राठी अंतरवाली येथील सभामंडपासाठी प्रत्येकरी दहा लाख असा एकुण 20 लाखाचा निधी मंजुर झाला आहे. धार्मिक कार्यक्रम तसेच गावातील मुलींच्या लग्नासाठी त्याचा वापर व्हावा या उद्देशाने हे सभामंडप सुसज्ज पद्धतीने बांधण्यात येणार आहे. चापडगाव येथील सभामंडपात चेंजींग रुम देखील बांधण्यात येणार आहे. या दोन्ही कामाचा शुभारंभ बुधवारी गावकऱ्यांच्या उपस्थितीत झाला. दोन्ही गावातील गावकऱ्यांनी या कामाबद्दल सतीश घाटगे यांचा सत्कार करुन आभार मानले. यावेळी बाजार समितीचे उपसभापती अरुण घुगे, युवा मोर्चाचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव कंटुले, सरपंच बंडू मुंढे, पंकज रक्ताटे आदी उपस्थित होते.