जालना – येथील अंबड चौफुली परिसरात अॅड. सलमान खान, अॅड. रमेश गाडे, यांच्या उपस्थितीत अॅड. अनिरुध्द घुले यांनी पत्रकार परिषद घेतली. असून यात त्यांनी जालना उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
जालना शहरातील अक्षय पाटोळे यांच्या खुन प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला पोलीस ठाण्यात आल्यानंतर अटक न करता त्याला 324 च्या दुसर्या घटनेत पोलीस ठाण्यातच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी जामीन दिल्याचा गंभीर आरोप अॅड. अनिरुध्द घुले यांनी आज गुरुवार दि. 18 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पत्रकार परिषदेत केलाय.
यावेळी पत्रकार परिषदेत अॅड. सलमान खान, अॅड. रमेश गाडे, शेख मुजीब शेख कादर यांची उपस्थिती होती. यावेळी अॅड. अनिरुध्द घुले यांनी बोलतांना सांगीतले की, उप विभागीय पोलीस अधिकारी हे पदाचा दुरुपयोग करीत असून त्यांनी शहरात हुकुमशाही सुरु केली आहे. त्यांना वाटेल त्याला शिक्षा करायची आणि वाटेल त्यांना सोडून द्यायचे असा प्रताप सांगळे यांनी सुरु केला असल्याचंही अॅड. घुले यांनी म्हटलय. मराठा आंदोलनात देखील सचिन सांगळे यांनी नियमबाह्य शरीराच्या वरच्या भागात निशाना साधून फायरींग केली, त्या बाबतचे फोटोच अॅड. घुले यांनी पत्रकार परिषदेत दाखविले. गजानन तौर यांच्या खुनाच्या आधी 3 नोव्हेंबर 2023 रोजी आरोपी लक्ष्मण गोरे आणि भागवत डोंगरे यांनी पोलीस प्रशानाला पत्र देऊन गजानन तौर आणि त्याचे साथीदार हे गावठी पिस्टल घेऊन गोकुळवाडी परिसरात फिरत असल्याची तक्रार दिली होती. याची पुर्ण माहिती पोलीसांना असूनही त्यांनी साधी नोटीस देखील काढली नाही. आणि हत्या झाल्यानंतर अनेक पिस्टल आणि तलवारी पोलीसांना जप्त केल्या. या तलवारी आणि पिस्टल जप्त करण्यापुर्वी पोलीसांना पुरेपुर माहिती असूनही कोणतीही तसदी पोलीसांनी घेतली नाही आणि आता ते दिखावा करीत आहेत. दोन तलवारी पकडायच्या आणि 20 जनांचे नावं टाकून प्रेसनोट काढायची ही चमकोगीरी कशासाठी असा सवाल देखील अॅड. अनिरुध्द घुले यांनी विचारलाय. जुन महिन्यात अक्षय पाटोळे या तरुणाचा फुलबाजार परिसरात खुन झाला होता. त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्याकडे आहे. त्या प्रकरणात एक आरोपी अजुनही फरार आहे. पंरतु, तोच आरोपी 22 सप्टेंबरला 324 च्या प्रकरणात त्याच पोलीस स्टेशनमध्ये येऊन जामीन घेऊन जातो, तरी देखील उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्याला 302 च्या प्रकरणात अटक केली नाही. यावरुन ते आरोपी सोबत हितसंबध जोपासत आहेत हे दिसून येत असल्याचा आरोपी देखील अॅड. घुले यांनी केलाय.