छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात लिफ्टने एका निवृत्त कृषी अधिकाऱ्याचा बळी घेतला आहे. लिफ्ट अर्धा तास बंद पडल्याने या अधिकाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आपण या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या. किशोर गायकवाड, असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. किशोर गायकवाड यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे ते शुक्रवारी दुपारी उपचारासाठी घाटी रुग्णालयात आले होते. रूग्णालयात जाण्यासाठी त्यांनी पायऱ्या चढून जाण्यापेक्षा लिफ्टचा वापर केला. ते बाह्य रुग्णविभागाच्या लिफ्टमध्ये गेले. परंतु ही लिफ्ट ना दुरूस्त होती.
किशोर गायकवाड बाह्य रुग्णविभागाच्या या लिफ्टमध्ये जवळपास अर्धा तास अडकले. त्यादरम्यान त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे गुदमरून त्यांचा लिफ्टमध्येच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घाटी रुग्णालयात वारंवार लिफ्ट नादुरुस्त होत असतात. अशाच एका लिफ्टने अखेर शुक्रवारी एक बळी घेतला आहे. लिफ्टमध्ये अडकल्याने किशोर गायकवाड यांचा श्वास गुदमरला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
किशोर गायकवाड यांच्यासोबत त्यांचे दोन नातेवाईकही रूग्णालयात आले होते. मात्र, ते या घटनेत वाचले आहेत. या घटनेमुळे घाटीतील ‘ना दुरुस्त लिफ्ट’ चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घाटीतील लिफ्ट बंद पडल्यामुळे निवृत्त कृषी अधिकाऱ्याचा श्वास कोंडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रूग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये काहीसं भितीचं वातावरण आहे. रूग्णालयातच लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे,