छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. दिवसेंदिवस खून, बलात्कार, अपहरण अशा घटना वाढत आहे. अशातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातूनच विद्यार्थिनीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या घटनेमुळे आता संभाजीनगरमध्ये चाललंय तरी काय? असा प्रश्न पडत आहे. आपण या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ही घटना घडली आहे. रात्री आठ वाजता हा प्रकार घडला आहे. रात्री बुलेटवर आलेल्या काही टवाळखोर तरूणांनी या विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्नकेला. या घटनेमुळे विद्यापीठातील विद्यार्थिनींमध्ये भितीचं वातावरण आहे.
बुलेटवर आलेल्या काही टवाळखोर तरुणांनी विद्यार्थिनीची छेड काढत अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. विद्यापीठातील वाय कॉर्नरवर हा संपूर्ण प्रकार घडला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी 6 सुमारास या विद्यार्थिनी फिरण्यासाठी वस्तीगृहाच्या बाहेर पडल्या होत्या. तेव्हा त्या बाहेर फिरत होता. त्यानंतर तेथे काही बुलेटवर टवाळखोर तरूण आले होते. त्या टवाळखोर तरुणांनी एका विद्यार्थिनीची छेड काढली. तिला बळजबरीने बुलेटवर बसून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरड केल्यानंतर परिसरातील काही विद्यार्थी जमा झाले. तेवढ्यात या टवाळखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केलाय.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच पुंडलिक नगर भागातील एका विद्यार्थिनीची छेड काढण्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला (Crime News) होता. त्यानंतर आता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्यानं महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विद्यापीठातूनच तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला आहे. आरडाओरड केल्याने आरोपी फरार झाले आहेत. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीतआहेत.