जालना – शहरातील बहुतांशी भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळे गॅस्ट्रो, डेंग्यूच्या रुग्ण संख्येत रोजच भर पडत असल्याचं आमदार कैलास गोरंट्याल यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे सोमवार दि. 22 जुलै 2024 रोजी दुपारी 2 वाजता आमदार कैलास गोरंट्याल यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन जाब विचालाय. येत्या रविवार पर्यंत स्वच्छतेच्या संदर्भात पाऊल न उचलल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आ. कैलास गोरंटयाल यांनी दिलाय.
जालना शहरातील बहुतांश भागात घाणीचे साम्राज्य पसरलय. स्वच्छता विभागाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना गॅस्ट्रो, डेंग्यू सारख्या आजारांना सामोरं जावं लागतंय. या संदर्भात जनतेने आ. कैलास गोरंटयाल यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आक्रमक पावित्रा घेत आज जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.