छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या ऑनरकिलींगच्या घटनेनं शहरातील नागरिक सुन्न झाले आहेत. बालपणीच्या मैत्रीणीवर प्रेम करत दोघांनी पळून जाऊन आंतरजातीय लग्न केलं. याचा राग मनात ठेऊन मुलीच्या वडीलांनी आणि भावाने तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आणि शहरात चांगलीच खळबळ माजली. आंतरधर्मीय विवाहामुळे हत्या केल्याची घटना ‘सैराट’ सिनेमाप्रमाणे केल्याची कुजबुज शहरभर पहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगरचा इंदिरानगर हा भाग तसा गजबजलेला. या भागातील रहिवासी अमीत साळुंखे याचे त्याच्या बालमैत्रीणीसोबत विद्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांमधूनच त्यांनी पळून जाऊन लग्न केले. आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून या तरुणीच्या वडिलांसह चुलत भावाने चाकूचे वार करत तरुणाला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. या दोघांनी तरुणाच्या पोटात आणि छातीत गंभीर वार केले. परजातीच्या मुलावर प्रेम केल्याने तरुणीच्या कुटुंबाचा या दोघांच्या लग्नाला तीव्र विरोध होता. पुढे अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने 2 मे रोजी ते घरी परतले. मात्र, विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघांनाही स्वीकारले नव्हते. तर, याउलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ अमितला जीवे मारण्याची धमकी देत होते. तरीही तरुणीने पळून जाऊन तरुणाशी लग्न केल्याचा राग मनात धरून मुलीच्या वडिलांनी आणि चुलत भावाने सैराट चित्रपटात दाखवल्याप्रमाणे जावयाची निघृण हत्या केली. यात जखमी झालेल्या तरुणाला गुरुवारी घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
१४ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरानगर भागात घडलेल्या घटनेनंतर गुरुवारी काल या तरुणाचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्याचा राग विद्याच्या वडिलांना व चुलता भावाच्या डोक्यात होता. याच रागातून विद्याचे वडील आणि तिच्या चुलत भावाने 14 जुलै रोजी अमितवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमित खाली कोसळला, त्याच्या पोटात खोलवर वार घुसल्यामुळे तेव्हापासूनच त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, 12 दिवसानंतर अमितशी मृत्यूशी सुरू असलेली झुंज गुरुवारी उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला.
ऑनर किलिंग च्या घटनेने संभाजीनगरशहर हादरून गेलं आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी वडील गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही हे दोघेही सध्या फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येतआहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. अमितच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. फरार आरोपींना तातडीनं अटक करा अशी मागणी त्यांनी केली आहे. नातेवाईकांकडून जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आलं.