घनसावंगी : विद्यमान आमदाराने राजकीय स्वार्थासाठी प्रत्येकवेळी आम्हाला खोटी आश्वासने देऊन आणि खोटी स्वप्ने दाखवून फसवणूक केली. येणाऱ्या निवडणुकीत २५ वर्षात केलेल्या फसवणुकीचा येणाऱ्या निवडणुकीत आम्ही घेणार हिशोब, अशा शब्दात घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथील जनतेनी सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शाखा स्थापनेत हुंकार भरला.
शनिवारी सरफगव्हाण येथे भाजपची १६१ वी शाखा मोठ्या उत्साहात झाली. या गावातील जनतेनी भर सभेत प्रस्थापित आमदारांनी केलेली फसवणूक सतीश घाटगे पाटील यांना बोलून दाखवली. या जनतेमध्ये प्रस्थापिताविरोधात प्रचंड असंतोष आणि रोष दिसून आला. परिवर्तनासाठी गावकऱ्यांनी दोन्ही हात उंचावून सतीश घाटगे पाटील यांना साथ देण्याचा विश्वास दिला. जनतेचा हा विश्वास येणाऱ्या काळात सार्थ ठरेल, असा विश्वास यावेळी सतीश घाटगे यांनी दिल.
याप्रसंगी असंख्य युवकांनी सतीश घाटगे यांच्या हस्ते भाजपात जाहीर प्रवेश केला. सर्व युवांचे आणि शाखेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष मार्गदर्शक व सदस्यांचे सतीश घाटगे यांनी पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना प्रत्येक अडचणीत सोबत उभा राहील, असा शब्द दिला.
या कार्यक्रमास अर्चनाताई सोसे, दत्ता टापरे, बाबासाहेब हरबक, माधव टेहळे, विठ्ठल देशमुख, भगवान तौर, नानाभाऊ वायाळ, विष्णुपंत जाधव, किरण भुतेकर, जाहीर पटेल, कृष्णा कौलांगे, अर्जुन बिटले, शंकर भालेकर, किरण गुडेकर, बाबासाहेब जाधव, राजू पवार, कैलास मुळे, भानुदास बर्डे, शिवाजी मुळे, सचिन पाटोळे, हरिचंद्र जाधव, सुदाम असोले, भानुदास धनवडे, लक्ष्मन’ थोरात, लक्ष्मण गोरे, अंकुश तांगडे, शेषराव बोर्डे, भीमाशंकर काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.