दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे मा. पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे आणि बोरामणी ग्रामस्थांच्या प्रयत्नातून विनंती बस थांब्याचा शुभारंभ सोलापूर एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक नागेश रामपुरे आणि सुनिल भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
बोरामणी येथे एसटी बस थांबा नसल्याने बोरामणी ग्रामस्थांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांनी सोलापूर एसटी आगार प्रमुखांना विनंती एसटी बस थांबा होण्याबाबत निवेदन दिले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत सोलापूर एसटी महामंडळाने बोरामणी बस थांब्याला तात्काळ परवानगी दिली. त्या निमित्ताने बोरामणी विनंती बस थांब्याचा शुभारंभ आज रविवारी करण्यात आला. बोरामणी येथे विनंती बस थांबा झाल्यामुळे बोरामणी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
विनंती बस थांब्यासाठी बनवण्यात आलेल्या दोन बोर्डांपैकी एक बोर्ड माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे आणि दुसरे बोर्ड माजी सरपंच राजकुमार हालसगे यांनी स्वखर्चातून बनवले आहे.
यावेळी यावेळी मा.पं. स. सदस्य धनेश आचलारे यांच्यासह माजी सरपंच राजकुमार हलसगे, चन्नवीर मटगे, रफीक मुजावर, सोसायटी चेअरमन भारत कवडे, वजीर मुजावर, आप्पा हलसगे, मा. सरपंच माणिक ननवरे, उपसरपंच संजय माळी, शाम भोसले, राज साळुंखे, अंकुश राठोड, राजकुमार हुकीरे, विश्वनाथ हेबळे, तेरे नाम, योगीनाथ करके, राजकुमार वाघमारे, विकास भोसले, दिलीप जेवळे, योगीनाथ करके,व्यंकप्पा पवार, शोएब पटेल, मारुती वाघमारे, नितीन मोहिते, नागनाथ विभूते, अबू भगरे, नन्नू नदाफ, विश्वनाथ स्वामी, चंद्रकांत जेवळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.