जालना येथील मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये पोस्टाद्वारे मागविण्यात आलेल्याउ 3 तलवारी जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई शनिवार दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी आली असल्याची माहिती दुपारी 2.30 वाजता स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली.
जालना जिल्हयातील अवैध शस्त्रे बाळगणार्यावर कारवाईच्या सुचना पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी दिल्या असतांना स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सुचाना दिल्या होत्या.
दरम्यान राहुल नटवरलाल व्यास रा. आर.पी. रोड, राम मंदीरा जवळ जालना याने पोस्टाद्वारे 3 तलवारी मागविल्या असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळातली होती. त्यामुळे त्यांनी मुख्य पोस्ट ऑफीस मध्ये जावून तपासणी केली असता 3 तलवारीचे पार्सल हे राहुल नटवरलाल व्यास याच्या घरी पाठविल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे पोलीसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातुन 3 धारधार तलवार मिळुन आल्या. सदरल तलवारी जप्त करण्यात आल्या असून सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, रमेश राठोड, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, देविदास भोजणे, सतिश श्रीवास, सोपान क्षिरसागर, धीरज भोसले यांनी केली आहे.