जालना : मतदार संघातील जनतेने ज्या विश्वासाने निवडून दिले. तो विश्वास सार्थ ठरवत मागील पाच वर्षांत आपण विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात मतदार संघातील अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यामुळेच मतदार संघात विकासाची कामे खेचून आणता आली, असे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी येथे बोलतांना केले.
जालना शहरातील प्रभाग क्रमांक २१ मधील दर्गावेस ते पाणीवेस या रस्त्याच्या नागरी दलितोत्तर योजनेतंर्गत सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ्ा आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल या होत्या. तर युवा नेते अक्षय गोरंट्याल, माजी नगरसेवक महावीर ढक्का, राम सावंत, विजय चौधरी, रमेश गौरक्षक, राजेंद्र वाघमारे, अशोक भगत, आरेफ खान, दुर्गेश काठोठीवाले, अतिक खान, मदन नारियलवाले, रणजीत मगरे, आसाराम ढवळे, श्रीकांत जाधव, इश्वर नारियलवाले, रामलाल साळुंखे, गणेशराव जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. गोरंट्याल म्हणाले की, विधानसभेत बोलण्यासाठीच पाठवले अशी टीका करणाऱ्यांनी चारवेळा आमदार आणि दोन वेळा राज्याच्या सत्तेत राज्यमंत्री असताना जालना मतदार संघाच्या विकासासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करत त्यांच्या कार्यकाळात झालेले एकतरी मोठे काम दाखवा, असे आव्हान आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी दिले. आपण मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात जालना मतदार संघातील अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडून राज्य सरकारचे लक्ष वेधले. आपण विधानसभेत बोलल्यामुळेच जायकवाडी ते जालना पाण्ाीपुरवठा योजना आणि आता शासकीय वैद्यकीय महािवद्यालयाचा प्रश्न तडीस लावला असून, शहर व ग्रामीण भागातील अनेक प्रश््न मार्गी लावून विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केल्याचे ते शेवटी म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करतांना संगीताताई गोरंट्याल म्हणाल्या की, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात स्वच्छतेसह नागरी मूलभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला. विशेष करुन स्वच्छतेबाबत प्रशासनाच्या मदतीने प्रभावीपणे काम केल्याने नागरिकांचे आरोग्य अबाधित राहिले.
कार्यक्रमास सीताराम टकले, सुधाकर छडीदार, श्रावण ढवळे, चंद्रकांत जाधव, कैलास वाघ, बाबूलाल गायकवाड, मुकुंद नािरयलवाले, अंकुश साळुंखे, बन्सीलाल ढवळे, सुरेश नारियलवाले, सुदेश वैष्णव, संतोष भवर, दीपक जांगडे, आसाराम ढवळे, अनिल सोनटक्के, चंद्रकांत जांगडे, अनिल कोकणे, कृष्णा भवर, शशिकांत भवर, प्रकाश श्िांदे, अख्तर कुरेशी, भोलेबा नारियलवाले, सुरेश छडीदार, जगन्नाथ गोधेकर, रोहित वाघ, शुभम मोरे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विकास भिसे यांनी केले, तर योगेश पाटील यांनी आभार मानले.