मुंबई विमानतळावर आज प्रचंड खळबळ उडाली. इंडिगो एअरलाइन्सच्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या आधी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होती. त्यामुळे या फ्लाइटची दिल्ली विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. ट्रिपल थ्रेट मिळाल्याने मुंबई विमानतळावर एकच खळबळ उडाली होती. फ्लाइट 6E 1275 मुंबईहून मस्कतला जात होती. दूसरी इंडिगो फ्लाइट 6E 56 मुंबईहून जेद्दाहला जात होती. या दोन्ही फ्लाइटला उडवून देण्याची धमकी आली होती.
या आधी सकाळी बॉम्बच्या धमकीनंतर मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटला दिल्ली विमानतळाच्या दिशेने नेण्यात आलं. एअर इंडियाची फ्लाइट सोमवारी पहाटे 2 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टहून निघालं होतं. त्यानंतर एक ट्विटवरून धमकी मिळाल्याने हे फ्लाइट दिल्लीत तातडीने उतरवण्यात आलं. आणि विमानाची कसून तपासणी करण्यात आली. मात्र विमानात काहीही नसल्याचं आढळून आलं आहे. फ्लाइट 6E 1275 मुंबईहून मस्कतला जात होती. दूसरी इंडिगो फ्लाइट 6E 56 मुंबईहून जेद्दाहला जात होती. या दोन्ही फ्लाइटला उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर एअर इंडियाने एक निवेदन जारी केलं. 14 ऑक्टोबर रोजी मुंबईहून JFK साठी उड्डाण भरणारी फ्लाइट एअर इंडिया 119ला एक स्पेशल सेक्युरिटी अलर्ट मिळाला. आणि सरकारच्या सुरक्षा नियामक समितीच्या आदेशानंतर ही फ्लाइट दिल्लीला डायव्हर्ट करण्यात आली. सर्व प्रवाशांना दिल्ली विमानतळावर उतरवलं. सुदैवाने कुणालाही काही झालेलं नाही, असं एअर इंडियाने म्हटलं आहे.
या दोन्ही विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा प्रोटोकॉलच्या नुसार दोन्ही विमानांना विमानतळापासून एका वेगळ्या परिसरात नेण्यात आले. संभाव्य धोका टाळण्यासाठी विमानाला वेगळ्या ठिकाणी उभं करण्यात आलं. त्यानंतर आम्ही एसओपी अंतर्गत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रक्रियेत संरक्षण टीम, बॉम्ब नाशक पथक आणि इतर एजन्सी सामील होत्या. विमानाची सखोल तपासणी केली जात आहे. कोणताही धोका होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे, असंही इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितलं.
गेल्या महिन्यातच एअर इंडियाच्या एका फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. गेल्या महिन्यात फ्लाइटच्या वॉशरुममधील टिश्यू पेपरवर ही धमकी देण्यात आली होती. ही पहिलीच घटना नव्हती. यापूर्वीही फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून या धमक्या वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी त्या धमकीची गंभीर दखल घेऊन फ्लाइट डायव्हर्ट केलं जात आहे. त्यामुळे प्रवाशाना हकनाक त्रास होतो.