जालना – दि 26 ऑगस्ट अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे प्रमुख लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी माजी आमदार संतोष सांबरे यांच्या निवासस्थानी ठिय्या देत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उभे राहावे असे आवाहन केले बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा सातत्याने शिवसेनेचा बालेकिल्ला राहत आलेला आहे स्वर्गीय नारायणराव चव्हाण यांनी सलग तीन वेळा तर माजी आमदार संतोष सांबरे यांनी एक वेळा या मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा फडकवलेला आहे 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीमुळे हा मतदारसंघ भाजपला सोडला त्यावेळीही येथील शिवसैनिकांनी इमाने इतबारे प्रयत्न करून नारायण कुचे यांना निवडून आणले निवडून आल्यानंतर नारायण कुचे कडून मतदारसंघातील एकाही शिवसैनिकाला न्याय मिळाला नाही सातत्याने त्यांनी शिवसैनिकांना गुंतवण्याकरताच प्रयत्न केले 2024 च्या निवडणुकीत नारायण कुचेचा पराभव करण्याकरता सर्व शिवसैनिक सज्ज झाले असतानाच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा सुटल्याने पुन्हा एकदा या मतदारसंघातील शिवसैनिकांचा हिरमोड झाला आणि त्यांनी संतोष सांबरे यांना या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा घेऊन अपक्ष उमेदवारी भरण्याचे आवाहन केले या मतदारसंघातील शिवसैनिक अत्यंत इर्षाने पेटला असून या निवडणुकीत नारायण कुचेला पराभूत करण्याकरता प्रचंड मेहनत घेऊ आणि गावागावात जाऊन संतोष सांबरे यांचा प्रचार करून त्यांच्या विजया करता जीवाचं राण करू असल्याचे शिवसैनिकांनी यावेळी बोलून दाखवले माजी आमदार संतोष सांबरे यांनी देखील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर ही निवडणूक लढणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की बदनापूर विधानसभा मतदारसंघावर मागील वेळी अन्याय झाला आणि इथल्या कडवट निष्ठावंत शिवसैनिकांनी तो सहन करून पक्षाचा आदेश म्हणून युतीच्या उमेदवाराचा प्रचार करून निवडून आणले. राष्ट्रवादीने अतिरेकी आग्रह करून जागा सोडून घेतली जिल्ह्यात तीन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे एवढी ताकद त्यांची नक्कीच नाही बदनापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकावर झालेल्या अन्यायाविरुद्ध निष्ठावंत शिवसैनिक लढा देणार आहेत निष्ठावंत शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जोरावर बदनापूर विधानसभा मतदारसंघात जिद्दीने निवडणूकला सामोरे जाणारे असून या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास माजी आमदार संतोष सांबरे यांनी कार्यकर्त्यांना दिला
यावेळी उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे, तालुकाप्रमुख अशोक बर्डे, जिल्हा परिषद सदस्य कैलासराव चव्हाण, युवासेना विभागीय सचिव विनायक चोथे, जिल्हा परिषद सदस्य गणेश डोळस, दिनेश काकडे, शिवाजीराव मदन, ताराचंद जाधव, राजू घुसिंगे, उपतालुकाप्रमुख बंडू पागिरे, सिद्धेश्वर उबाळे, कल्याण टकले, संजय जाधव, रामेश्वर फंड, रामसिंग सोळुंके, अर्जुन ठोंबरे, भरत मदन, सिद्धूसिंह जराड, सुशीलकुमार रुपवते, गोवर्धन उगले, अंकुशराव शिंदे, लक्ष्मीकांत मालपाणी, श्रीराम कान्हेरे, किसन खंडेकर, अरुण डोळसे, विठ्ठल आदमाने, गजानन सानप, मुकुंद हुसे, सिताराम धुळे, शैलेश दिवटे, परमेश्वर म्हात्रे, केशव क्षीरसागर, रामभाऊ मसलेकर, अनिस पठाण, गणेश अंभोरे एकनाथ इंगळे गणपत गव्हाड, राजू जऱ्हाड, राहुल जराड, नंदू पुंड, रामेश्वर पारवे विजय जाधव, शाम तिकांडे, श्याम राठोड, रमेश वराडे, लक्ष्मण आढाव, बबनराव डोईफोडे, संभाजी टकले, संतोष बर्गे, सुरेश घोरपडे, सुरेश राठोड ,जगन्नाथ कदम, गजानन महाराज देठे, दत्ता जगताप, बळीराम कोल्हे, बाबासाहेब जोशी, शंकर फुके, कचरू पठाडे, राम मिसाळ, विष्णु शिंगारे, विठ्ठल जाधव, विष्णू सोनवणे, रमेश वनारसे, तारेख शेख, दत्तप्रसाद चव्हाण, अमोल टोपे, सतीश धुपे, कृष्णा कोल्हे, अंबादास गीते, राहुल पांडे, आसिफ पटेल, फैजान मिर्झा, अलीम पटेल, परमेश्वर चंद, विलास पवार, काकासाहेब ढाकणे, शिवनाथ मोरे, विष्णू सपकाळ, राजू बदर, रउफ पटेल, शागीर सिद्धगी, जावेद सत्तार खान, शकीर शेख, भाऊसाहेब तांबे, अण्णासाहेब बनसोडे, बाळू कांबळे, दविद लोखंडे, ज्ञानेश्वर गरबडे, रामेश्वर भोजने, विष्णू टोपे, कृष्णा थेटे, नारायण सांगोळे, बाळासाहेब नारळे, शिवाजी तारडे, बिबीशन ननवरे, उद्धव घनघाव, संतोष खरात, पांडुरंग दळवी, विठ्ठल जारवाल, सुधाकर खैरे, विष्णू पडोळ, रंगनाथ मगर, अशोकराव चव्हाण, काकासाहेब वीर, यमन कातोरे, विष्णू वाघमारे, बाजीराव शिरसागर, अमित चव्हाण, रामेश्वर पोकळे, सचिन राजगिरे, राजू आटोळे,सुरेश राठोड, विष्णू गारखेडे, बाळू अंभोरे, गणेश अंभोरे, किशोर मदन, अतुल मदन, संभाजी मदन, सोमीनाथ मदन, पी डी मदन, बाळू कांबळे, भरत मात्रे, गजानन बोंद्रे, सुभाष आरसुळ, ज्ञानदेव ननवरे, नारायण जीवडे, पाराजी जाधव, साईनाथ शिंगारे, विजय भिडे, रावसाहेब पैठणे, कृष्णा खांडेकर, राजू पैठणे, मिलिंद साळवे, बाळू कातुरे, तात्याराव शेळके, सुदामराव काळे, उद्धव दीक्षित, अशोक वखरे, वैजनाथ गवारे, शेषराव दोडके, मोहम्मद भाई, गणेश शिरसाट, अंबादास गीते, जगन्नाथ कदम, योगेश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रल्हाद चुंगडे, अर्जुन चव्हाण, गजानन लहाने, प्रल्हाद भडांगे, कृष्णा वळेकर शांताराम बोचरे,सचिन पाय तोडे, प्रेमसिंग शिरे, हिंदू सिंग कोकड, संजय अंभोरे, तपन पडगने, राजू बदर, विठ्ठल बोरडे, बाबासाहेब इंगळे, राम इंगळे, शंकर फुके, रशीद पठाण, जनार्दन जाधव, गजानन पवार, रणधीर पिंपळे, सिताराम वीर, सोमनाथ मस्के, नारायण लोहकरे, शांताराम बोचरे, सुभाष मदन, कृष्णा ओवळेकर, वसीम तांबोळी, महादेव जाधव, लक्ष्मण गव्हाड, विजय जाधव, गणपत दादा भोजने, कडूबा इंगळे, सुजित पांढरे, अमोल बोरुडे, रत्नाकर लोखंडे, अशोक बोरडे, दीपक राजगिरे, रामेश्वर लोखंडे, राजू आटोळे, सतीश चव्हान, अशोक भसंडे, गोरख डोके, शाम तिकांडे, कृष्णा टोपे, बद्रीनाथ मोटकर, योगेश उबाळे, रामा दिवटे, राहुल वाघमारे, प्रल्हादराव डुबल, बाळासाहेब नारळे, हरिभाऊ नारळे, नितेश जाधव, बाबासाहेब वंजारे, साईनाथ काळे, नारायण सांगोळे, सिताराम दिवटे, लक्ष्मण गोडसे, केशर सिंग बमणावत, राहुल घुले, गोकुळ राजळवळ, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकते मोठ्या संख्येने उपस्थित होते