जालना शहरात कचरा करणार्या लोकारवर जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने कारवाईचा बडगा उगारलाय. सोमवार दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेच्या सुमारास रस्त्यावर कचरा टाकणार्यावर कारवाई करुन त्यांच्याकडून 10 हजार रुपयाचा दंड वसूल केलाय.
जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोड ते पित्ती पेट्रोल पंप रोडवर सार्वजनिक ठिकाणी नितीन शामराव लालझरे यांनी ट्रॅक्टरमध्ये कचरा भरुन तो रस्त्याजवळ सार्वजनीक जागेवर रिकामे करतांना आढळुन आले. त्यामुळे त्यांच्यावर गैरकृत्य केल्याचा ठपका ठेवत त्यांना 10 हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आलाय. ही कारवाई जालना शहर शहर महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख पंडीत पवार, स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे व प्र. स्वच्छता निरीक्षक रविंद्र कल्याणी यांनी केली.