जालना तालुक्यातील मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. नराधम पित्यानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात नराधम बापा विरोधात पोक्षोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी गुरुवार दि. 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता दिलीय.
गेल्या काही वर्षांपूर्वीच मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुलाने आईवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणांमध्ये मा. न्यायालयाने नराधम मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल गेल्या तीन चार दिवसांपूर्वीच न्यायालयाने दिला असतानाच आज पुन्हा धक्कादायक घटना समोर आलीय. जालना तालुक्यातील पिंप्री डुकरी येथील रहिवासी असलेला आणि परतुर येथे वास्तव्यास असलेल्या एका नराधम बापाने त्याच्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बालात्कार केलाय. जानेवारी 2018 पासून वेगवेगळ्या ठिकाणी नेत नराधमांने हा बालात्कार केला. या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी आरोपीला अटक केली आहे.