पाचशे रुपयासाठी भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. कल्याण मधील रोहिदास वाडा परिसरामध्ये सख्ख्या भावांनेच भावाची पाचशे रुपये घेतल्याच्या रागातून धारदार शास्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. कल्याण पश्चिममधील रोहिदासवाडा परिसरात खान कुटुंब राहत आहे. नईम शमीम खान असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून सलीम शमीम खान असं आरोपी भावाचं नाव आहे.
अधिकची माहिती अशी की, कल्याण पश्चिममधील रोहिदासवाडा परिसरात खान कुटुंब राहत आहे. या कुटुंबात आईसह तिघे भाऊ राहतात. मोठा भाऊ आरोपी सलीम शमीम खान मयत नईम शमीम खान आणि त्याचा एक भाऊ असे चार जण राहतात. रात्री सलीम याचे पाचशे रुपये नईमने घेतल्याचा संशय सलिमला आल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादात सलीम याने नईम याच्यावर घरातील स्वयंपाकासाठी वापरणाऱ्या धारदार चाकूने वार करत नईमची हत्या करून सलीम फरार झाला. या घटनेची माहिती कल्याण बाजारपेठ पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपीला 12 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.
पोटी जन्माला आलेलं अपत्य ते कोणत्याही मातापित्याला महत्त्वाचं असतं… ते मतिमंद, असो का वेडसर ,असो किंवा विकलांग, असो ते जन्मदात्यांना आपल्या जीवापेक्षाही जास्त पालन पोषण करत त्याला मोठं करत संस्कार देण्याचा प्रयत्न करतात.. मात्र तेच एखादा आपत्य मातापित्याचे जीवावर कसं उठतं याचं उत्तम उदाहरण आज वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात पाहायला मिळालं …..लोणी गावात राहणाऱ्या पुंजाजी नरवाडे या 50 वर्षीय यांची त्यांच्याच 25 वर्षीय (वेडसर )मुलगा गणेश याने हत्या केली आहे.
दुपारी दोन वाजताच्या दरम्यान गणेशने आपल्या जन्म दात्या पित्याच्या डोक्यावर दगड विटाने वार करत हत्या केल्याचा प्रकार उघड झालंय.. पित्याची हत्यानंतर ही वेडसर गणेश हा घटनास्थळीच बसून होता.. जेव्हा हत्याचा प्रकार शेजारी असलेल्या लोकांना कळाला त्या वेळेस रिसोड पोलिसांना या बद्दलची माहिती देताच घटनास्थळी रिसोड पोलीस पोहचले असून घटनेचा तपास करत असून घटनेचं कारण मात्र अद्याप कळालेलं नाही…