जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णावर योग्य उपचार न केल्याने व आरोग्य विभागातील सेवा देणार्यांनी हलगर्जीपणा केल्यानेच तरुण मुलाचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून हलगर्जीपणा करणार्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केलीय.
सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार नेमका काय आहे हे पाहण्यासाठी सविस्तर विडीओ पहा
ही घटना आज दि. 17 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. नितिन लहु कमद, वय 25 वर्ष रा. गारखेडा, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा असं मयत मुलाचं नाव असून त्याच्या नाकातून रक्त येत असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, रुग्णालयात आल्यानंतर आयसीयु मध्ये कोणत्याही सेवा रुग्णाला मिळाले नाहीत. रुग्णाला साधा बेड मिळाला नाही, रुग्णाला शौचालयाच्या जवळ झोपवण्यात आले. ऑक्सीजन लावला नाही, इसीजी केला नाही, 24 तास उलटून देखील सेवा मिळाली नसल्याने व त्याच्यावर उपचार झाले नसल्यानेच त्याचा मृत्यु झाला. त्याच्यावर जर उपचार झाले असते तर तो मुलगा वाचला असता असा आरोप नातेवाईकांनी केलाय. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यु झाला असल्याने त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी मयत मुलाचा मोठा भाऊ अभिजीत कदम आणि मामा दिलीप काकडे यांनी केलीय.