खोपोली येथील अदिती पवार यांना संगीताताई राष्ट्रीय स्नेहबंध प्रेरणाज्योती पुरस्काराने पंढरपूर येथे विठुरायाच्या नगरीत गौरविण्यात आले.
यावेळी सिंधुताई सकपाळ यांची मानस कन्या सीमाताई, संगीताताई, परभणी चे पोलीस अधिक्षक काळे साहेब, पंढरीनाथ कदम, कृष्णकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. अदिती ताईंचे काम व समाजसेवा पाहुन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. अदिती पवार यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे.