औरंगाबाद :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक (माहिती) मराठवाडा विभाग, औरंगाबाद कार्यालयातील उपसंपादक संजीवनी जाधव यांची विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई येथील सहायक संचालक (माहिती) पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांना आज कार्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला. सहायक संचालक (माहिती) गणेश फुंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्रीमती जाधव यांचे अभिनंदन केले.
मंजुश्री मुळे, प्रतीक्षा शेजूळ, यशोदा ताठे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सहायक अधीक्षक प्रविण भानेगावकर, प्रदर्शन सहायक राजेंद्र वाणी यांच्यासह कैलास म्हस्के, दशरथ वानोळे, प्रकाश राऊत, स्वाती शार्दूल, पांडुरंग जाधव, अनिल बिरोटे, अशोक सुरडकर, चंद्रकला दाभाडे, गणेश सुरासे आदी उपस्थित होते.