तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खरपुडी येथे असलेले बेकायदेशर ध्वज तालुका पोलीसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास काढले. पोलीसांनी भल्या पहाटे ध्वज काढून गावात कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
अपडेट व्हिडीओ पाहण्यासाठी हिरकणी चॅनलला सब्स्क्राईब करा…
जालना तालुक्यातील खरपुडी येथील गट क्र.197 मध्ये लावण्यात आलेला पंचरंगी ध्वज काढल्या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खरपुडीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यावर धार्मीक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता तर बेकायदेशीर ध्वज लावल्या प्रकरणी देखील 13 जनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यामुळे तालुका पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खरपुडी येथे लावण्यात आलेले सर्वच बेकायदेशीर झेंडे काढून टाकले. दि. 5 जानेवारी रोजी पहाटे 5.30 वाजता 100 पोलीसांचा बंदोबस्त लावून एक पंचरंगी ध्वज तर एक निळा ध्वज काढण्यात आला. यापुर्वी 3 झेंडे काढण्यात आले होते.
ही कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु, परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजु मोरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये, एपीआय खाडे, वडते, तुपे, एएसआय सय्यद मज्जीद, महिला पीएसआय तुपे, डी.एसबी चे पो. कॉ. सुनिल गांगे, पो.नाईक संदीप बेराड, किशोर जाधव, कृष्ण भडांगे, वसंत धस, लक्ष्मण शिंदे, राम शिंदे यांच्यासह 100 जनांचे पोलीस पथक घटनास्थळी आहेत.