जालना । मराठवाड्यासह खान्देश आणि जळगावमधून दुचाक्या चोरणार्या जालन्यातील दोघांना सदर बाजार पोलीसांनी शुक्रवारी(दि. 6) रोजी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी तब्बल 6 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 12
दुचाकी जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी शहरातून चोरीस गेलेल्या दुचाकीचा सदर बाजार पोलीस तपास करीत असतांना त्यांना खबर्यामार्फत शहरातील शेर सवारनगर येथील शेख मोसीन शेख सलीम, टट्टुपुरा येथील मुश्ताईक आरेफ बागवान यांनी चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यावरुन दोन्ही आरोपींना सदर बाजार पोलीसांनी ताब्यात घेवून चौकशी केली असता आरोपींनी मराठवाड्यासह खान्देश आणि जळगावमधून 12 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल साडेसहा लाखांच्या 12 जप्त केल्या आहेत. यात जालना जिल्ह्यातील 4, औरंगाबाद शहर येथील 3, औरंगाबाद ग्रामिण येथील 1, जळगाव येथील 1, बुलडाणा जिल्ह्यातील 1 आणि 2 अन्य ठिकाणाहून चोरल्याची माहिती चोरट्यांनी दिली. अधिक तपास सदर बाजार पोलीस करीत आहेत.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, ईरशाद पटेल, धनाजी कावळे, जगन्नाथ जाधव, सोमनाथ उबाळे, सागर बावीस्कर,भैय्या चौरे, मनोहर भुतेकर, भरत ढाकणे, पिल्लेवाड यांनी केली आहे.