जालना शहरातील अंबड रोडवरील गणेश नगर येथील धम्मसाधना बुध्द विहारात दि. 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता बुध्द मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त बुध्द विहारात विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
तत्पुरर्वी सकाळी 8.30 वाजता बुध्द मुर्तीची मिरवणूक काढण्यात येणार असून 10 वाजता धम्म ध्वजारोहन करण्यात येणार आहे. यावेळी औरंगाबाद येथील पू. भिख्खु करुणानंद थेरो, पू. भिख्खु ग्यानरक्षीत थेरो, नालंदा बुध्द विहार येथील पू. भिख्खु शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र, पू. भिख्खु सारीपुत्त थेरो, पू. भिख्खु धम्मबोधी थेरो, पू. भिख्खु धम्मधर, पू. भिख्खु धम्मानंद थेरो, पू. भिख्खु प्राज्ञाकिर्ती, पू. भिख्खु रेवत, पू. भिख्खु राजरत्न, पू. भिख्खु बोधीशिल, पू. भिख्खु कल्याण धम्मों यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुपारी 12.15 वाजता धम्म प्रवचण होणर असून दुपारी 2.30 वाजता भोजनदान करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठापणा सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन धम्मसाधंना बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष दिलीप एम. शिंदे, सचिव प्रमोदकुमार डोंगर दिवे, मलवार, सुनील वाघमारे, अरुण डोगरदिवे, म्हस्के, रुस्तुम तुपे, पारधे, फकिरा वाघमारे, डोळसे, बोर्डे, खरे, सुनील म्हस्के, जयेश गायकवाड, गंगावने यांच्यासह गणेश नगर, योगेश नगर, अंबड रोड जुना जालना येथील सर्व उपासक आणि उपासिकांनी केले आहे.