सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : 3 जानेवारी 2023 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय येथे डॉक्टर नाळे हॉस्पिटल बारामती यांच्या मार्फत विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींची दंतचिकित्सा करण्यात आली तसेच सर्व विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर केतकी नाळे, डॉक्टर नेहा भोपळे, डॉक्टर अंकिता गिरमे यांनी विशेष कष्ट घेतले तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ मीना जाचक यांनी या कार्यक्रमाला हातभार लावला ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थिनींना दाताचे महत्त्व समजून सांगण्यात आले व त्यासाठी कोणते चांगले उपाय करता येतील याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रवींद्र देशपांडे माजी माता पालक संघाचे अध्यक्ष व सौ रेखा पवार माजी मुख्याध्यापिका कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी यांचे सहकार्य लाभले.रयत इंग्लिश मिडीयमच्या प्राचार्या भारती जाधव व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री घनवट कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉक्टर कर्णे, डॉक्टर बोराटे यांनी हजेरी लावली उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉक्टर केतकी नाळे यांनी शिक्षण घेत असताना आपल्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष दिले पाहिजे असे सांगितल सौ.रेखा पवार यांनी विद्यालयाच्या गुणवत्तेचे कौतुक केले तसेच यशाचे शिखर गाठण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले .
प्रतिक साळवे यांनी मनोगत व्यक्त केले,या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता काटकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षक विठ्ठल निकाळजे, भगत सर ,पडोळे सर, वसव मॅडम, बनगर मॅडम , राजगे मॅडम यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोलवडकर मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे आभार वसव सर यांनी मानले.