क्रिप्टो करंन्सी म्हणजेच आभासी करंन्सीच्या दारात आलेली घसरन पाहुण खोतकर यांच्या जावयांनी गुंड आणि माफियांकडुन बंदुक आणि शस्त्राचा धाक दाखवत किरण खरात यांना किडनॅप केले होते. गुंडाकडुन जिवे मारण्याची धमकी दीली आणि खरात यांचे राहते घर, सराफनगर येथील चार प्लॉट या मालमत्ता नावावर करुण घेतले. एवढेच नाही तर गावात बंदुकधारी काही गुंड पाठवुण हॉटेल नावावर करुण देण्यासाठी दबाव टाकल्याचे कथन किरण खरात यांनी केले असून आ. कैलास गोरंट्याल यांनी या प्रकरणी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या जावयावर गंभीर आरोप केलेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
जिल्ह्यात चार वर्षापुर्वी आभासी चलनाचा व्यवहार, खरेदी विक्री सुरु झाली होती. यात हॉटेल व्यवसायीक किरण खरात हे ग्लोबल डिजीटल क्लस्टर कॉईन जिल्ह्यात काम पाहत होते. काही रुपयांत मिळणारे हे चलन आज हजार ते लाख रुपयाच्या घरात गेले. बाजारातील चढ उताराचा परिणाम या आभासी चलनावर होत असल्याने हे घेणारे आणि विक्री करणारे देखील यात बदलत असतात. काही दिवसांत केंद्र सरकारच्या क्रिप्टो करंसी च्या विधेयकामुळे गोंधळाचे वातावरण होते. आणि सहाजिकच याचा परिणाम यावर झाला आणि यातील गुंतवणुकदार चिंतेत पडला. वास्तवात या करंसीला कोणताही नियम, निर्बंध आणि आरबिआय सारख्या संस्थेचा वचक नसल्याने अवैध धंदे, काळा बाजार किंवा राजकिय नेते या ठिकाणी आपला काळा पैसा पांढरा करुण घेण्यासाठी उत्साही असतात. अशातच माजी मंत्री खोतकर यांचे जावयी विजय झोल यांनी यात करोडो रुपयांची गुंतवणुक केली होती. यात काही रक्कम हि स्वताच्या नावाने 1 ते 2 कोटी तर काही अंदाजीत 7-8 कोटी रुपये नातेवाईक आणि कार्यकर्त्यांच्या नाववर गुंतवली. यातील लाभ मिळत होता तो पर्यन्त झोल यांना खरातांवर प्रेम होते. मात्र गेल्या काही दिवसांपासुन हे चलन वाढण्या ऐवजी घसरत होते. यामुळे झोल यांनी आपला पैसा मिळावा म्हणुन थेट खरातांचे पुणे येथे अपहरण केले असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी म्हटले. किरण खरात हे आपल्या पुणे येथील घरी होते. त्या वेळी दि. 4 जानेवारी रोजी जालना येथील काही गुंड, हातात शस्त्र तसेच बंदुक घेउन आले आणि खरात यांच्या राहत्या घरातच अपहरण केले. त्यांनी तब्बल दहा दिवस खरात यांना या गुंडांनी त्रास दिला. या काळात त्यांनी आपले जालना येथील सराफ नगर भागातील राहते घर, याच भागातील 4-5 प्लॉट झोल यांनी स्वतःच्या नावे करुण घेतले. एवढेच नाही तर त्यांनी खरात यांना 16 कोटी रुपयांची मागणी केली आणि हि मागणी शेवटी 9 कोटी रुपयांवर आली. विजय झोल यांनी दिलेली रक्कम आणि खरात यांनी त्यांना दिलेल्या परताव्याचे सर्व रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचे किरण खरात म्हणाले. त्यांचे आजही त्यांच्याकडे असलेल्या कॉईनची किंमत 4 ते 5 कोटी रुपये असल्याचे किरण खरात यांनी सांगीतले. किरण खरात तिन दिवसांपूर्वी कसेबसे त्यांच्या तावडीतुन सुटुन जालना मार्गे आपल्या मंगरुळ खरात या गावी गेले. याची कुणकुन झोल यांना लागताच काही गुंडांनी रविवार दि. 15 जानेवारी रोजी मंगरुळ गाव गाठले आणि हवेत गोळीबार करीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यातुन गावकरी आणि गुंडांत वाद झाला वाद जास्तच वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी मध्यस्ती करीत वाद मिटवला. मात्र खरातांना जालना येथे जिवे मारण्याची धमकी दिली.
सोमवार दि.16 जानेवारी रोजी जालना पोलिस अधिक्षक यांना भेटण्यासाठी आणि झालेल्या घटणेसंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी जालनाकडे निघाले होते. यावेळी शेकडो समर्थक देखील त्यांच्या सोबत होते. हि माहिती पोलिसांना समजताच त्यांनी खरात यांना थांबवुन हा जमाव इथेच ठेवा आणि आपण स्वता जालना येथे जा अशी समजुत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र समर्थक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. दरम्यान आ. कैलास गोरंट्याल यांना घनसावंगी येथे जाऊन किरण खरात यांना धिर दिला.