उरण दि 21(संगीता ढेरे ) – गव्हाण जिल्हा परिषद विभागीय काँग्रेस कमिटी तर्फे शुक्रवार दि.20 जानेवारी 2023 संद्याकाळी 7 वाजता पनवेल तालुक्यातील वहाळ येथे जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी लढणारे काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आपले विचार मांडतांना सांगितले की काँग्रेस पक्ष हा संविधान मानणारे आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांबद्दल काँग्रेस पक्षाला नेहमीच आदर राहिला आहे.
काँग्रेसपक्षा कडून त्यांचा सन्मान होणे हि अतिशय आनंदाची गोष्ट आहे.आणि हिच खरी काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे. याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. ज्या दिवशी मी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पद स्वीकारले त्याच दिवशी मी ठरवलं होतं की ज्या ज्या जेष्ठ लोकांनी काँग्रेस पक्षासाठी आपले आयुष्य समर्पित केल आहे त्यांचा सन्मान प्रत्येक तालुक्यात जाऊन करायच. रायगड जिल्यातील सर्व तालुके पूर्ण झाल्यावर आज पनवेल तालुक्यातील गव्हाण जिल्हा परिषद विभागीय काँग्रेस कमिटीच्या वतीने विभागातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान आज. करण्यात आला.
यावेळी ह. भ. प गोविंद महाराज वहाळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास परिसरातील शेकडो जेष्ठ नागरिक उपस्थित होते. त्या सर्वांचे कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत व काँग्रेसचे जेष्ठ नेते. आर सी भाई घरत, पनवेल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नंदराजशेठ मुंगाजी, रायगड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस वसंत म्हात्रे,श्याम घरत, केसरी दापोलकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मढवी गुरुजी यांनी केले.