शरीराला जखम झाली
तर औषध आहे
ह्रदयावर घाव झाले
तर काय आहे?
ढग बरसायला लागले
तर छत्री आहे
डोळ्यातून अश्रू वाहले
तर काय आहे?
पायाला काटा टोचला
तर काढायला सुई आहे
मनाला शब्द टोचले
तर काय आहे?
भीती आडवी आली
तर पळायला रस्ता आहे
अहंकार आडवा आला
तर काय आहे?
एखादी गोष्ट जळाली
तर विमा आहे
पण स्वप्नच जळाले
तर काय आहे?
कोणतीही वस्तू तुटली
तर जोडायला पर्याय आहे
शेवटी माणूसच तुटला
तर काय आहे?
सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९