उरण ( संगीता पवार ) – एक विकसीत शहर अशी ओळख निर्माण करु पाहणाऱ्या उरण तालुक्यात आगरी, कोळी आणि कराडी समाजा बरोबर विविध जाती धर्मांचे लोक वास्तव करत आहेत.अशा विविध जाती धर्मांच्या लोकांच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचे काम महेश बालदी मित्र मंडळाच्या माध्यमातून उरण महोत्सव २०२३हे करणार आहे.त्यामुळे उरण महोत्सव ही एक उरण करांना पर्वणीच लाभणार आहे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले.
महेश बालदी मित्र मंडळाच्या वतीने उरण – कोट नाका मैदानात गुरुवार ( दि१९) ते रविवार ( दि२२ ) या चार दिवसांत आयोजित करण्यात आलेल्या उरण महोत्सव २०२३ चे उध्दघाटन माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी ( दि१९) मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले आहे. याप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर हे बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदी,सिने अभिनेत्री सविता मालपेकर ,, अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर मावू ), विद्याताई म्हात्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष निळकंठ घरत, चंद्रकांत घरत,उद्योगपती पंडित घरत, भाजप शहराध्यक्ष कौशिक शहा, भाजप महिला तालुका अध्यक्षा राणी म्हात्रे, नगरसेविका जन्व्ही पंडित ,नगरसेवक राजेश ठाकूर भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उरण शहर महिला अध्यक्ष संपदा थळी, ,प्रदिप नाखवा,उरण महोत्सवाचे आयोजक पप्पू सुर्यराव ,सारिका पाटील , सिद्धेश शिंदे , आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उरण तालुक्यातील कलाकार, गायक, चित्रकार, शिवप्रेमी तरुणांचा सन्मान करण्यात आला.
उरण परिसराचा चेहरा मोहरा बदल आहे.त्याचे संपूर्ण श्रेय हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी यांना जात आहे. आज उरण नगरीतील विविध जातींच्या लोकांसाठी उरण महोत्सवाचे आयोजन हे महेश बालदी मित्र मंडळाच्या वतीने उरण नगरीत करण्यात येत आहे.त्या महोत्सवातून आपल्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन मिळणार असून या महोत्सवातील विविध पदार्थांचा आस्वाद ही घेता येणार आहे असे प्रतिपादन सिने अभिनेत्री सविता मालपेकर यांनी व्यक्त केले. .मुलगी झाली हो या मालिकेतील पूजा पुगावकर ( मावू ) यांनी हि कार्यक्रमास सुभेच्छा दिल्या.
उरण महोत्सवाचे आयोजन हे पप्पू सुर्यराव यांनी महेश बालदी मित्र मंडळाच्या माध्यमातून अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत केले आहे.या महोत्सवाचा आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येत आहे.ही उरण करांच्या दुष्टीनी अभिमानाची बाब आहे.आज उरणच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जवळ जवळ १५० ते ४०० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.तसेच कर्णाळा पक्षी अभयारण्याच्या अत्याधुनिक सुशोभीकरणासाठी राज्य सरकारकडून भरीव तरतूद करण्यात येणार असल्याने भविष्यात निश्चित कर्णाळा अभयारण्यात पर्यटकांचा ओढा वाढणार आहे.असे आमदार महेश बालदी यांनी नमूद करत आपल्या भाषणातून उरण महोत्सवाचे आयोजक पप्पू सुर्यराव यांचे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. नृयाचे स्पर्धा घेण्यात आली
या प्रसंगी ,माजी उपनगराध्यक्ष जयवीन कोळी , पप्पू सूर्यराव ,सिद्धेश शिंदे , सारिका पाटील हितेश शाह ,मनन पटेल अजित भिंडे ,मदन कोळी ,माजी नगरसेवक राजेश कोळी ,उद्योजक सुनील पेडणेकर ,मनोहर सह्तीया ,संतोष ओटावकर ,रोहित पाटील ,निवेदक निलेश पंडित तसेच महिला वर्ग ,, मोठ्या संखेने उपस्थित होते . सूत्रसंचालक निलेश पंडित यांनी केले .