नांदेड (सारिका बकवाड) – ता २० आज भोंजा हवेली येथे राष्ट्रमाता राजमाता मॉं जिजाऊ आईसाहेब यांचे पुजन करून श्री पाटील बुवा जि. प. उत्पादक कंपनी लि. चे भोंजा हवेली येथे उद्घाटन करण्यात आले श्री पाटील बुवा कंपनी (FPO) मुळे भोंजा गावातील व आजुबाजूच्या परिसरातील गावातील सदस्यांना शेतकरी लाभार्थी यांना एकत्रित करून शेतकऱ्यांचें उत्पन्न दुप्पट व प्रत्येक कुटूंब लखोपती झाले पाहिजे हा उद्देश ठेवून चेअरमन गणेश नेटके व संचालक गणेश चव्हाण यांनी याची जबाबदारी घेतली आहे.
यावेळी प्रकाश कुलकर्णी, सरपंच समाधान कोळी, संचालक नवनाथ घाडगे, प्रेरणास्थान विलास नेटके, नेते जगन्नाथ भांदुर्गे, चेअरमन गणेशदादा नेटके, संचालक शशिकांत कुलकर्णी, संचालक बाळासाहेब नेटके, शिवश्री नवनाथ नेटके, शिवश्री संजय जाधव, प्रफुल्ल मोरे, सुधीर टमटमे, भाऊसाहेब भांदुर्गे, प्रदिप नेटके, दादासाहेब मोरे, बिरमल कोंडलकर, राजाभाऊ मोरे, कृष्णाबापु मांजरे, अमोल मोरे, आप्पा नेटके, भैरवनाथ मोरे, सुर्यकांत नेटके, सत्यवान मोरे, लव्हु जाधव, देविदास सरवदे, शिध्देश्वर मोरे, अंकुश कणसे, किरण मोरे, जोतीराम ननवरे, त्रिंबक मोरे इ मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.