पुणे-नांदेड एक्सप्रेस रेल्वेने परभणी जिल्ह्यातील प्रवास करणार्या एका 20 वर्षीय महिलेने बदनापूर ते जालना प्रवासादरम्यान रेल्वेतर एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. महिलेची प्रसुती होत असल्याचे पाहुन रेल्वे कर्मचार्यांनी धावाधाव करुन महिलेला तात्काळ आरोग्य सेवा पुरविली.
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील बोरडा येथील धनश्री किरण इचके ही महिला नातेवाईकासोबत पुणे ते गंगाखेड असा रेल्वेच्या सामान्य डब्यातून प्रवास करीत होती. परंतु, जिला बदनापूर ते जालना दरम्यान प्रसुतीच्या कळा सुरु झाल्या. जालना रेल्वे स्थानक जवळ येत असतांनाच तिन बाळाला जन्म दिला. परंतु, बाळाची नाळ तोडण्याची कोणतीही सुविधा गाडीत नसल्याने तीला जालना रेल्वे स्थानकावर उतरवून रेल्वेच्या आरोग्य विभागाकडून मदत पुरविण्यात आली. त्यानंतर 108 च्या रुग्णवाहीकेला बोलावून महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. सदरील महिलेने मुलाला जन्म दिला असून बाळ आणि आई दोघेही सुखरुप आहेत.