दर वर्षी दिला जाणारा मानाचा आणि अत्यंत महत्वाचा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार या वर्षी देखील दिला जाणार असून या पुरस्कारासाठी राज्यभरातून ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख ही 5 फेब्रुवारी 2023 असून त्यानंतर आलेल्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही.
शैक्षणीक, सामाजिक, आरोग्य, पत्रकारीता, साहित्य, उद्योग व कृषी, संशोधन, शौर्य, क्रीडा आणि कलेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या महिला या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवू शकतात. सदरील पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविल्यानंतर निवड झालेल्या पुरस्कारार्थींना पत्र पाठवून कार्यक्रमाचे स्थळ, वेळ आणि दिनांक कळविण्यात येईल. सदरील अर्ज हे https://forms.gle/qxqdq2GfyiizxFpc6 या लिंकवर भरावेत असे आवाहन जालना येथील सौ. करुणाताई मोरे, सातारा येथील सौ. विद्याताई निकाळजे, रायगड येथील सौ. संगीताताई ढेरे, अहमदनगर येथील सौ. अनिताताई काळे, सिंधुदुर्ग येथील सौ. संपदा बागी देशमुख, नाशिक येथील सौ. संगीताताई देशमुख, ठाणे येथील विद्याताई गडाख यांनी केले आहे.