महाराष्ट्रात जो उठतो तो म्हणतो मी शिवरायाचा मावळा… कर्म बघीतले तर गुन्हेगारी विश्वात पुढच्या नंबरवर असतो… परंतु, या राज्यात आणि या देशात शिवरायांचे खरे मावळे आहेत का? हो नक्कीच आहेत. परंतु ते देखावा कधीच करीत नाहीत. ते थेट आया बहिणीच्या रक्षणार्थ कधीही आणि कुठेही उभा राहतात. ते जात, पात, धर्म, पंत, भाषा असा कुठलाही भेद करीत नाहीत, तेच खरे मावळे आहेत. बाकी शिवरायाच्या नावाने राजकारण करुन पोट भरणारे कावळे आहेत. खरे मावळे कधीच देखावा करीत नाहीत. जे देचावा करतात ते मावळे नसतातच.. ते असतात शिवरायाच्या नावाने पोट भरणारे भामटे… जे आया बहीनीची छेड काढतात… महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेतात. नको तीथे तोंड खपसून आया बहीनींची इज्जत चव्हाट्यावर आणतात… अशा बोगस आणि स्वार्थी लोकांना मावळे म्हणून खर्या मावळ्यांचा अपमान करण्या सारखे आहे.
या महाराष्ट्रात विविध जाती धर्माच्या महिलावर अन्याय अत्याचार झाले तेंव्हा हेच शिवरायांचे मावळे म्हणवून घेणारे कुठे लपून बसलेले असतात ते कळत नाही. ती आपल्या जातीची नाही म्हणून तीच्यासाठी का आंदोलन करायचे? असा प्रश्न उपस्थित करणारे जेंव्हा स्वतःला मावळे म्हणून घेतात तेंव्हा त्यांचा कोणत्या शब्दात निषेध करावा तेच कळत नाहीत. शिवरायांच्या राजवटीत कधीही कोणत्याही महिलेवर अन्याय झाला तर त्यांनी असा प्रश्न कधी उपस्थित केला होता का? त्यांनी जात पाहुन कधी महिलेची बाजून मांडलीय का? मग तुम्ही आम्ही जात पाहुन पिडीतेसाठी न्याय मागणारे कोण? जर खरंत स्वतःला मावळे म्हणून घेत असाल आणि खरंच शिवरायाचे पाईल असाल तर कोणत्याही जाती धर्माच्या पिडीतांसाठी धावून जायला हवे. त्याशिवाय शिवरायांना देखील बरे वाटणार नाही. हा राष्ट्र आता जाती धर्मात विखूरला जात आहे. त्याचेच शिवरायांना फार वाईट वाटत आहे. केवळ शिवरायांची जयंती आली तरच उदो उदो करुन चालणार नाही. त्यासाठी आपल्या सर्वांनाच कायमस्वरुपी शिवरायाच्या राज्याची निर्मीती करावी लागणार आहे. नको तो देखावा आणि नको तो भंकस पणा… स्वतःच्या जिवनात आणावा शहानपणा… चला तर जाती धर्मात विखुरलेल्या लोकांना एकत्र आणूया… शिवरायांचे स्वराज्य निर्माण करुया… राजकारण करणार्यांना धडा शिकवून देशहीताचे कार्य करुया आणि या राष्ट्रातील दिनदुबळ्यांना हक्काचा आधार देऊयात.
महाराज गडपती, गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपत, अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत राजनितिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.
पुढील अपडेट माहित करण्यासाठी हिरकणी अॅप डाऊनलोड करा… डॉऊनलोड करण्यासाठी याच लिंकवर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978