जालना जिल्हा गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीने ढवळून निघालाय. गल्ली बोळातील गुन्हेगारापासून ते राज्य पातळळीपर्यंतचे गुन्हेगार जालना जिल्ह्यात धुमाकुळ घालीत आहेत. असे असतांना जिल्हा पोलीस दलातील अधिकारी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची हिंम्मत करीत नाहीत. शिवाय गुन्हेगारी रोखण्यात देखील पोलीस यंत्रणा पयशी ठरत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. यावरुन जिल्हा पोलीस दल गुन्हेगाराकडून हायजॅक झाले काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकातून विचारला जात आहे. खून, दरोडे, बालात्कार, चोर्या आणि मारामार्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बेकायदेशीर वाहनापासून ते बेकायदेशीर आणि अवैध धंद्यापर्यंत सर्वच जोरात सुरु आहे. स्थानिक अधिकार्यांच्या अशिर्वादाने असे असूही शकते, परंतु, जिल्हा पोलीस दलातील अधिकार्यांच्या हे लक्षात येत नाही काय? माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करतात का? पोलीसांच्या नाकर्तेपणामुळे दिवसा ढवळ्या सर्वसामान्यांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. दिवसा ढवळ्या गुन्हेगार नंग्या तलवारी, खंजर आणि प्राणघातक हत्यारं घेऊन फिरत आहेत. गल्लो-गल्ली होणार्या मारामार्यात देखील हत्यारं वापरली जात आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यात प्राणघातक हत्यारं वापरण्याची मुभा तर दिली गेली नाही ना? असा प्रश्न निर्माण झालाय. जालन्याचा बिहार कधीच झालाय, त्यामुळे जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हुकुमशाही सुरु झाली आहे. गुन्हेगारी लोकांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आबाधीत राहीली नाही. रस्त्यावरुन प्रवास करतांना कोण कधी कुठे आडवून लुटमार करील हे सांगता येत नाही. सुरुवातीला जालना जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांनी कडक भुमीका घेतली होती. त्यांचा जालना जिल्ह्याला मोठा फायदा होईल अशी नागरीकांची भवना आहे. पंरतु, वाढत्या गुन्हेगारीवर कारवाई न करणार्या स्थानिक अधिकार्यांनी पोलीस अधिक्षक यांच्या डोळ्यात धुळफेक केल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे चारचाकी आणि दुचाकी वाहनावर ठळक अक्षरात पोलीस लिहीलेलं असतं आणि ती गाडी गुन्हेगाराच्या हातात दिसून येते. त्यामुळे पोलीसांच्या गाडीचे स्टेअरींग गुन्हेगारांच्या हातात आल्याची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. पोलीस असल्याचे भासवून अनेकांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वेळीच नियोजन करण्याची अपेक्षा आहे.