हैदराबादमध्ये चार वर्षांच्या चिमुकल्याया भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलगा खेळत असताना कुत्रांनी हल्ला चढवला. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून मुलाचे वडील धावत आले आणि त्यांनी त्याला कुत्र्यांपासून वाचवले आणि जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान चिमुरड्याचा मृत्यू झालाय. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निजामाबादचा रहिवासी असलेले गंगाधर हैदराबादमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. गंगाधर आपल्या मुलाला घेऊन काम करत असलेल्या ठिकाणी घेऊन आले होते. मुलगा खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने मुलावर हल्ला चढवला. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसतं त्यानुसार, मुलगा धावत कुठेतरी जात असताना मागून तीन कुत्रे येऊन त्याच्यावर हल्ला करतात. एक कुत्रा हल्ला चढवतो, त्यावेळी मुलगा जमिनीवर पडतो. त्यानंतर दुसरे कुत्रेही त्याच्यावर हल्ला चढवतात. मात्र त्यातूनही मुलगा पुन्हा उठून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत पळतो. मात्र पुन्हा कुत्रे चिमुकल्यावर हल्ला चढवतात. सीसीटीव्ही फूटेजमधील दृष्ये तुम्हाला विचलित करु शकतात. मुलाच्या रडण्याच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील धावत येतात आणि कुत्र्यांपासून त्याची सुटका करतात. तातडीने मुलाला ते रुग्णायात घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यात मुलाचा मृत्यू झाला आहे.
बिहार, उत्तर प्रदेशपासून ते महाराष्ट्र, गुजरातपर्यंत कुत्र्यांच्या दहशतीच्या बातम्या समोर येत आहेत. गुजरातच्या सुरत महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या 15 दिवसांत कुत्रा चावण्याच्या 477 प्रकरणांची नोंद झाली आहे. कुत्र्यांचा बळी ठरलेल्या लोकांमध्ये तीन वर्षांच्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंतचा समावेश आहे.