नवी मुंबई : उरणमधून मोठी बातमी हाती आली आहे. हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेला अपघात झाला आहे. मिळालेल्या मार्गावर हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर रेल्वेला अपघात झाल्याची घटना घडली आहे. खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ हा रेल्वे अपघात झाला आहे. खारकोपर येथे जाणारी रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या अपघातामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सकाळी ८ वाजून ४६ मिनिटाला झालेल्या या अपघाताने प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती. या अपघातानंतर रेल्वे आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. रुळावरून घसरलेले तीन डबे पुन्हा एकदा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या अपघाताबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, ‘बेलापूर ते खारकोपर लोकल ट्रेनचे ३ डबे खारकोप स्थानकाजवळ रुळावरून घसरले. सकाळी ८.४६ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घटनेत प्रवाशांना कोणतीही जीवितहानी झाली नाही.
‘रेल्वे दल मदतीसाठी घटनास्थळाकडे रवाना झालं आहे. या रेल्वे अपघातामुळे आता बेलापूर-खारकोपर-नेरुळ मार्गावर कोणत्याही लोकल ट्रेन सुरू नाहीत, अशी माहिती शिवाजी सुतार यांनी दिली.