अकोला – हैदराबाद महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. नांदेडच्या दाभड जवळ मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी कार चालका विरोधात अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्याने कार महामार्गावरील दुभाजकावरुन समोरुन येणाऱ्या टेम्पोला धडक दिली. त्यामुळे टेम्पोने दुसऱ्या कारला धडक दिली. या तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात नांदेड मधील अमित घुगे या तरुणाचा तर रामा प्रल्हाद डोंगरे या सोलापूर जिल्ह्यातील व्यक्तीचा मृत्यू झाला.
या घटनेतील अपघातग्रस्तांना माेठा धक्का बसला आहे. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना महामार्ग पोलिसांनी नांदेड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.




















