सातारा (संगीता ढेरे) : महिमानगड सामाजिक विकास प्राधिकरण महाराष्ट्र राज्य नव प्रेरणा महिला मंडळ उत्कर्ष सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन विशेष नारी सन्मान 2023 स्वर्गीय सौ सुवर्ण देवी गोडसे स्मृतिप्रित्यर्थ महिला सन्मान पुरस्कार व प्रश्नमंजुषा स्पर्धा दिनांक 4 मार्च 2023 रोजी व मा शिंदे कन्या विद्यालयात पार पडला.
या कार्यक्रमात एकूण 15 सन्माननीय महिलांना पुरस्कार मिळाले यामध्ये आदर्श माता शिला दोशी, आदर्श सासू जनाबाई जाधव, आदर्श सून सौ हेमांगी ताथवडेकर आदर्श विस्तार अधिकारी सोनाली विभुते , आदर्श वकील मीनल कुलकर्णी, आदर्श विभागीय कार्यकारी अधिकारी सौ.संगिताताई ढेर, आदर्श पत्रकार विद्या निकाळजे , राष्ट्रीय खेळाडू कशीश शेख कलाक्षेत्रात सौ.सीमा दडस कंडक्टर अर्चना चौगुले, परिचारिका रेश्मा हाके, आदर्श डाॅक्टर सायली चिरमे, पोलिस निलम रासकर, कविता चौगुले, रेखा जाधव, सौ. संगिता काटकर यांना सन्मानित करण्यात आले.प्रशनमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यशस्वी महिला साबळे यांना पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. किरण कांरडे , सौ.रेखा पवार माजी मुख्याध्यापिका कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवडी, घोडके, धायगुडे, पोळ यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महिमानगड फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन ऊर्फ गणेश गोडसे यांनी सहकार्य केले.