उरण ( संगीता पवार ) : जागतिक महिला दिन २०२३ या दिनाचे औचित्य साधून उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरण यांच्या वतीने जागतिक महिला दिन नगरपरिषदेचे महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शाळा क्रं. १ व २ पटांगण , पेन्शनर पार्क उरण येथे , मोठ्या साजरा करण्यात आला ,त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या सामाजिक उद्योजक आणि विज्ञानसंप्रेषक च्या .स्वाती बेडेकर, विशेष अतिथी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री , पुर्णिमा तळवळकर, , माजी नगराध्यक्षा सौ सायली म्हात्रे, . नीता महेश बालदी व ,पंतप्रधान मुद्रायोजनेच्या महाराष्ट्र संचालक पदावर काम करणाऱ्या मा. वर्षा भोसले आदि मान्यवर उपस्थित होत्या.
ढोलताशा, लेझीम, व स्काऊट च्या संचलनाने मोठ्या दिमाखात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षादिनाच्या पवित्र स्मृतींना स्काऊटच्या संचलनाने मानवंदना देण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले संस्थेच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांनी उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या सर्व सद्श्यांचे कौतुक करून बोलविल्या बद्दल आभार मानले .व मोलाचे मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे निमंत्रित पाहुण्यांनी आपल्या शब्दसुमनांनी आलेल्या महिला वर्गांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष कामगिरी केलेल्या महिलांनाही सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्यात १ ) महिला पोस्टमन -प्राची प्रकाश म्हात्रे , २ )महिला पोस्टमन -रुपाली घरत , ३) महिला अॅटो रिक्षा चालक -सारिका पाटील . ४ ) पत्रकार संगीता दिनेश पवार ४) उद्योजिका – दिपिका संदीप जाधव आदींना सन्मान चिन्हव पुष्प गुच्छ देऊन गौरविण्यात आले . महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध नृत्याविष्कार ही सादर करण्यात आले . कार्यक्रम घेण्यात आले त्यात २० महिला मंडळांतील .महिलांनी नृत्य सादर केले या कार्यक्रमात खाद्य पदार्थ व कपड्यांचे ,स्टोल लावण्यात आले होते . उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरण च्या वतीने जागतिक महिला दिन २०२३ निमित्त सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहे त्यात नवजात कन्यारत्न सन्मान ,अन्नदान ,आदिवासी वाडीवर खाऊ वाटप ,योगा मार्निग कट्टा ,नेत्र चिकित्सा ,महिला आरोग्य तपासणी शिबीर ,सीबर्ड विशेष मुलांच्या शाळेला साहित्य वाटप ,व शाळेला देणगी अशी विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत सर्व सद्श्यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे असे आयोजकांनी सांगितले . ,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उरण महिला सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरण संस्थापकीय अध्यक्षा सौ. गौरी देशपांडे ,महिला मेळाव्याच्या कार्याध्यक्षा गौरी हेमंत मंत्री, , सचिव निशा शिरधनकर ,खजिनदार अॅड वर्षा पाठारे , कल्याणी दुखंडे, प्रमिला गाडे , दिपाली शि़दे,सीमा घरत निलिमा थळी अफशा मुकरी,प्रगती दळी, दिपा मुकादम ,नाहिदा ठाकूर ज्योस्ना येरुणकर ,संगीता पवार , कल्पना तौमर,शुभांगी शिंदे, संध्याराणी ओहोळ ,अनिता कोळी,,पत्रकार तृप्ती भोईर , प्रियांका पाटील , गीता पवार आदींनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनीषा म्हात्रे यांनी केले .