जालना (प्रतिनिधी) – उज्ज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि हिरकणी ग्रुप च्या वतीने जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने एक पालकत्व असलेल्या मुलीला तीच्या पदवी शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. तीने 12 वी नंतर सोडलेले शिक्षण पुन्हा सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देऊन पुढील शिक्षणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष सौ. करुणा मोरे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करणार्या उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने या वर्षीचा जागतिक महिला दिन हा वेगळ्या पध्दतीने साजरा केलाय. महिलांच्या न्याया हक्कासाठी काम करीत असतांना उद्याचे भावी अधिकारी केवळ पैशामुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे हुशार मुलींना शिक्षणासाठी मदत करण्याचे संस्थेच्या वतीने जाहिर करण्यात आले. केवळ हार तुरे घालून एकमेकांना शुभेच्छा देऊन महिला दिन साजरा करणे योग्य नाही तर, गरजवंत महिलांना त्यांच्या त्यांच्या समस्या प्रमाणे मदत करणे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणे महत्वाचे आहे. आणि तेच काम हिरकणी ग्रुप आणि उज्ज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. 12 वी नंतर अर्धवट शिक्षण सोडून घरीच असलेल्या मुलीला पुढील शिक्षणासाठी तीच्या आवडीच्या क्षेत्रात पदवी अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी लागणार्या शैक्षणीत शुल्कासह इतर सर्व शैक्षणीत सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. असेही संस्थेच्या अध्यक्षा सौ. करुणा मोरे मोरे यांनी सांगीतले.